97632 06212 pwatsaru@yahoo.com

संपादकीय लेख


Pariwartanacha Watsaru, a Marathi fortnightly is being published for the last 21 years. Started as one back to back page issue besides being a self-avowed ‘un-periodical’ Watsaru has come to be known as one of the most regular fortnightly in the Marathi literary world. It has earned an epithet of committed, serious and critical magazine (Maharashtra has ever seen after Magowa and Tatparya in the seventies and early eighties). Its chief motto is to unravel the complex material reality in all its ramifications in order to change it for better, egalitarian tomorrow. 

 

Informative and critical analysis of socio-politico-economic as well as cultural and literary theory as well as practice is one of the salient feature of Watsaru since its inception. But a determined attempt has been made recently to understand and analyze contemporary events of various hues in the form of the cover story, commentary articles as well as research / special articles. It also publishes good quality literary works in the form of poems, short stories, one act plays etc. Reviewing newly arrived English/Marathi books is also one regular feature. Divali special issue is another activity that is being run for as many numbers of years. Besides publishing full length novels and dramas Watsaru Divali issue has always made it a point to cover one major contemporary issue exhaustively. These Divali issues have received Yashwantrao Chavan Award for two consecutive years in 2010 and 2011. In the year 2006 it also secured Maharashtra Foundation (USA) award for its overall contribution to progressive journalism. In the year 2018 Watsaru received 'Prabodhan Puraskar' given by Thane based NGO 'We Need You'.

 

 

From May 2016 renowned critical journal Economic and Political Weekly (EPW) has joined hands with Pariwartanacha Watsaru as a part of its efforts to reach out to non-English audience. A special section has been started since then titled ‘EPW’.

 

 

 

Author


गेल्या १८ वर्षांपासून ‘परिवर्तनाचा वाटसरू’ हे मराठी पाक्षिक आहे. एका पाठपोठ पानापासून सुरुवात करण्यात आलेल्या आणि स्वघोषित ‘अनियतकालिक’ असलेल्या ‘वाटसरू’ने आज मराठी साहित्य विश्वामध्ये एक नियमितपणे प्रकाशित होणारे पाक्षिक म्हणून नाव मिळवले आहे. सत्तर-ऐंशीच्या दशकांमध्ये महाराष्ट्राने ‘मागोवा’ आणि ‘तात्पर्य’ सारखी मासिके पाहिली होती. यानंतर मात्र ‘परिवर्तनाचा वाटसरू’ने एक सामाजिक बांधिलकी जपणारे, गंभीर आणि चिकित्सकपणे विषयाचा आढावा घेणारे नियतकालिक म्हणून नाव कमावले आहे. समतेच्या तत्वावर आधारित एका चांगल्या ‘उद्या’चे’ निर्माण करण्याच्या हेतूने, वर्तमानातील वास्तवाच्या गुंतागुंतीच्या बाजू आणि त्यांचे परिणाम उलगडून दाखवणे, या हेतूने ‘वाटसरू’ कार्यरत आहे. बारा वर्षांच्या एकहाती वाटचालीनंतर, वाटसरूचा दर्जा उत्तम व्हावा आणि मोठया प्रमाणावर प्रसार व्हावा या हेतूने, वाटसरूने ‘युनिक अकादमी’ या सुधारणावादी विचारांच्या शिक्षण संस्थेबरोबर एकत्र येऊन काम सुरु केले.


विविध सामाजिक आर्थिक आणि राजकीय घटनांचे माहितीपर आणि विश्लेषणात्मक आकलन तसेच साहित्यिक आणि सांस्कृतिक सिद्धांतांचे करण्यात येणारे उपयोजन ह्यासाठी सुरुवातीपासून ‘वाटसरू’ ओळखले जाते. गेल्या काही वर्षांत मात्र नव्या संपादकीय गटाने, विविध समकालीन घटनांचा सर्वांगीण आढावा घेण्याच्या दृष्टीने, आणि त्यांचे चिकित्सकपणे आकलन करून देण्याच्या दृष्टीने, ‘मुखपृष्ठ कथे’च्या रूपाने, काही मान्यवरांच्या टिका टिपणीच्या स्वरूपातील लेख तसेच संशोधनात्मक लेख असे काही ठोस प्रयत्न सुरु केले आहेत. ‘वाटसरू’ मार्फत काही दर्जेदार कविता, साहित्य, लघुकथा, एकांकिकादेखील प्रकाशित केल्या जातात. नव्याने प्रकाशित झालेल्या मराठी इंग्रजी पुस्तकांची परीक्षणे हे देखील ‘वाटसरू’ मधील नियमितपणे प्रकाशित केले जाणारे सदर आहे. अगदी सुरुवातीपासून ‘वाटसरू’मार्फत ‘दिवाळी अंक’देखील नियमितपणे प्रकाशित केले जात आहेत. या अंकांमध्ये पूर्ण कादंबऱ्या तसेच नाटके प्रकाशित केली जातात. तसेच समकालीन राजकारणातील एखादा अत्यंत महत्वाचा विषय विशेष विभागाद्वारे सखोलपणे हाताळला जातो. ‘वाटसरू’च्या दिवाळी अंकाला २०१० आणि २०११ अशी सलग दोन वर्षे ‘यशवंतराव चव्हाण’ पुरस्कार जाहीर झाला आहे. २००६ साली ‘वाटसरू’ ला सुधारणावादी पत्रकारितेमधील योगदानाप्रीत्यर्थ महाराष्ट्र फाउंडेशन, (अमेरिका) यांचा पुरस्कार मिळाला आहे.


२०१६च्या मे महिन्यापासून Economic and Political Weekly (EPW) या गाजलेल्या इंग्रजी नियतकालिकाने बिगर इंग्रजी वाचकांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने ‘वाटसरू’बरोबर संयुक्तपणे काम सुरु केले आहे. ‘(EPW) मधून’ या नावाने ‘वाटसरू’मध्ये एक सदर सुरु करण्यात आले आहे.


ह्या नियतकालिकाबरोबरच युनिक अकादमीचा गट विद्यार्थी आणि समाजाचा चिकित्सक दृष्टिकोन विकसित व्हावा यासाठी प्रयत्नशील आहे. हेच ध्येय साध्य करण्याच्या दृष्टीने गेली काही वर्षामध्ये आम्ही अनेक उपक्रम संयुक्तरीत्या आयोजित केले आहेत. त्या पैकी वार्षिक व्याख्यानमाला हा एक महत्त्वाचा उपक्रम २०१२ पासून सुरु आहे. त्या वर्षी व्याख्यानमालेचा मुख्य विषय होता: उदारीकरणाची २० वर्षे: एक चिकित्सक आढावा’. २०१३ सालचा विषय होता, ‘बदलता महाराष्ट्र’ आणि २०१४ सालच्या व्याख्यानमालेमधे ‘शहरे आणि शहरीकरण’, तर २०१५ साली ‘प्रशासनामधील मुद्दे’ या विषयावर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. ज्येष्ठ अभ्यासक, निवृत्त व कार्यरत नोकरशहा, वरिष्ठ पत्रकार आणि ज्येष्ठ कार्यकर्ते यांनी या व्याख्यानमालांमध्ये सहभाग नोंदवला आहे. याचबरोबर व्याख्याने, चर्चा, परिसंवाद आणि सिनेमांचे सादरीकरण हे उपक्रमदेखील नियमितपणे आयोजित केले जातात. अकादमीतर्फे, वेगवेगळ्या सामाजिक आर्थिक प्रश्नांवर आणि उपक्रमांवर पुस्तके प्रकाशित करण्यासही सुरुवात केली आहे. रिपब्लिकनांची हाराकिरी, अर्थपालाची रोजनिशी, पाश्चात्त्य विचारसरणींच्या इतिहासातील महत्त्वाचे टप्पे, देश-प्रदेश: प्रादेशिक राजकारणाच्या बदलत्या दिशा, एक डॉक्टर असलेला इंजिनिअर, अर्थचित्रे, ऊर्जास्वातंत्र्याच्या दिशा, लातूर जिल्ह्याची राजकीय प्रक्रिया, महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर...?, वित्त भांडवल, डावी चळवळ, आणि गरीब जनता, शेती, शेतकरी आणि अर्थकारण, नवीन होतकरू कार्यकर्त्यांसाठी टिपणवही - भाग १, जुन्याजाणत्या कार्यकर्त्यांसाठी टिपणवही भाग २, मुलांनी फुलायचे तर, अर्थपूर्ण शिक्षणाच्या दिशेने, आधुनिकतेचे आगमन, कोसळलेले सोविएट मॉडेल, गॅस वॉर: साट्यालोट्याची भांडवलशाही आणि अंबानी, स्वातंत्र्य : एक चिंतन, विचारवंत आणि समाज – नागोराव कुंभार गौरव ग्रंथ, दुष्काळाला भिडताना, महाराष्ट्रातील दुष्काळ अशी एकूण बावीस पुस्तके आजपर्यंत प्रकाशित करण्यात आलेली आहेत तर काही प्रसिद्ध होण्याच्या वाटेवर आहेत. सामाजिक राजकीय आणि आर्थिक सिद्धांतामधील प्रमुख विषयांवर प्राथमिक माहितीपर पुस्तके प्रकाशित करण्याचे नियोजनदेखील सुरु आहे.