भारताच्या तत्कालीन स्वार्थी इतिहासातून पुढे भविष्यात स्वार्थाची किंवा स्वार्थी वृत्तीची एक संस्कृती जन्माला आली. भारतीय लोकशाहीत ती फुलत गेली आणि समानरित्या सर्वच जाती, वर्गाच्या येणार्या पिढीत रुजत गेली. मागास वर्गाच्या नवीन पिढीत सुद्धा. हिताचा पाठपुरावा व स्वार्थाशी संघर्ष करताना त्यांनीही स्वार्थ आत्मसात केला.