दि. २० मार्च २०२६पासून महाडच्या ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या व मनुस्मृती दहनाच्या शताब्दी वर्षाचा प्रारंभ होत आहे. भारतीय समाज परिवर्तनाच्या चळवळीत व मानव मुक्तीच्या संग्रामात, महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाचे मोठे महत्त्व आहे. या चवदार तळे सत्याग्रहाच्या संघर्षातूनच स्वतंत्र ‘दलित चळवळी’चा पाया घातला गेला.