97632 06212 pwatsaru@yahoo.com

क्रांती मोर्चा की गर्दी मोर्चा?


आमच्या काळात पुरोगामी चळवळीमध्ये आलेल्या प्रामाणिक बहुजन कार्यकर्त्याची पहिली कसोटी ही होती की, तो आधी त्याच्या कुटुंबीयांपासून किती तुटलेला आहे? आणि दुसरी अत्यंत महत्त्वाची कसोटी ही होती की तो आपल्या स्वजातीपासून पूर्णपणे तुटलेला आहे की नाही? समाजवादी चळवळ, मार्क्सवादी-कम्युनिस्ट चळवळ या जशा या नियमाला अपवाद नाहीत, त्याचप्रमाणे कॉ. शरद् पाटील यांचा सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षही अपवाद नव्हता. आम्ही विद्यार्थिदशेत असतानाच या चळवळीत आलो, तेव्हा कॉ. पाटील यांनी आम्हाला वारंवार या नियमांच्या कसोटीवर घासून-पुसून घेतले. परिणामी आम्ही कौटुंबिक लग्न-विधी समारंभातून व जातीच्या कार्यक्रमातून स्वतःला हद्दपार करून घेतले. घरातल्या सत्यनारायणाच्या पूजेपासून, नातेवाईकांच्या लग्नसमारंभापर्यंतच्या सर्वच कार्यक्रमांवर आमचा बहिष्कार असायचा! जातीच्या सभा-संमेलनांना उपस्थित राहायचे म्हणजे अहो पापम्!

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe