97632 06212 pwatsaru@yahoo.com

दलित अत्याचार कायद्यात दुरुस्ती : एक दिशा


मी मध्यमवर्गीय कुटुंबातील आईच्या पोटी जन्माला आलो आणि मध्यमवर्गीय कुटुंबप्रमुख असलेल्या बापाच्या कुटुंबात वाढलो. त्यामुळे रस्त्यानं चालताना डाव्या बाजूनं चालावं अशा प्रकारच्या, नागरिक म्हणून पाळाव्या लागणार्या कायद्याची माहितीच नव्हे तर अशा कायद्याचे पालन करण्याची सवय लहानपणापासूनच अंगी भिनलीय आणि ती अजूनही शिल्लक आहे. शहादा आदिवासी चळवळीचा भाग म्हणून काही कायदे जाणीवपूर्वक जाहीरपणे तोडले. पण नागरी जीवन सर्वांसाठीच सुरक्षित जगता यावे ह्यासाठी केलेले कायदे न पाळण्यात शौर्यत्व वा क्रांतिकारकत्व आहे, असं न वाटणारा असा मी अजूनही एक कायदेभीरू नागरिक आहे. नागरिकत्वाचे कायदे पाळण्याची सवय झालेला - सवयींचा गुलाम म्हणा. त्यामुळे निर्मनुष्य रस्त्यानंही मी अजूनही डाव्या बाजूनंच चालतो. तर ते असो.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe