97632 06212 pwatsaru@yahoo.com

आधुनिकतेचे आगमन : युरोपकेंद्री इतिहासाचा ‘जागतिक’ विचार


राजकीय इतिहासाच्या कुंपणात बंदिस्त न होता संकल्पनांचा इतिहास या क्षेत्रात महत्त्वपूर्ण हस्तक्षेप करणार्‍या दत्ता देसाई यांच्या आधुनिकतेचे आगमन या पुस्तकामुळे सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासक, संशोधक व विद्यार्थ्यांना मराठी भाषेतून आधुनिकतेची ऐतिहासिक व तात्त्विक पार्श्‍वभूमी समजून घेणे शक्य होणार आहे. बहुपर्यायी आणि उपयुक्त ज्ञानाच्या बाजारपेठेत गंभीर वैचारिक व सैद्धांतिक लेखन दुष्प्राप्य होत असताना असे खणखणीत नाणे आणले आहे ही स्वागतार्ह बाब आहे.