97632 06212 pwatsaru@yahoo.com

राजा शिवछत्रपती - इतिहास आणि इतिहासद्रोह


‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तिकेचे लेखक कॉ. गोविंद पानसरे यांचा कोल्हापुरात खून झाला आणि काही महिन्यांतच ‘राजा शिवछत्रपती’ या लोकप्रिय पुस्तकाचे लेखक आणि वक्ते बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र सरकारने मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला. त्यानंतर महाराष्ट्रात मोठे वैचारिक वादळ उठले. एका गटाने वृत्तपत्रीय लेख, व्याख्याने, निषेध सभा, पुस्तिका, मीडियावरील चर्चासत्रे इ.द्वारे पुरंदरे यांना पुरस्कार देण्यास विरोध केला; तर दुसर्या गटाने त्या विरोधाचा प्रतिवादही केला. विरोध करणार्या गटाने आपले विचार महाराष्ट्रात अगदी तालुका पातळीपर्यंत पोचवण्यात यश मिळवले. परंतु पुरंदरेंच्या ‘राजा शिवछत्रपती’चे सम्यकपणे आणि समर्थपणे खंडन करणार्या, त्यातील इतिहासद्रोह नेमका उलगडून दाखवणार्या एका सशक्त पुस्तकाची उणीव सतत जाणवत होती. ही उणीव आ. ह. साळुंखे यांच्या ‘पुरंदरेंची इतिहासद्रोही बखर’ या पुस्तकाने उशिरा का होईना, पण भरून काढली आहे.