97632 06212 pwatsaru@yahoo.com

रोहित वेमुलाचे दलितत्व


केंद्रातील भाजप सरकारचा वरदहस्त लाभलेले हैदराबाद विद्यापीठाचे वादग्रस्त कुलगुरू अप्पा राव पोडिले यांच्या कृष्णकृत्यांमुळेच दलित संशोधक विद्यार्थी रोहित वेमुला याला आत्महत्या करणे भाग झाले. आणि आता तोच रोहित देशभरातील विद्यार्थी आंदोलनांचा चेहरा म्हणून समोर आला आहे. रोहितची हत्या संस्थात्मक पातळीवर झालेली असली, तरी त्या संस्थात्मकतेला एक चेहरा होता आणि तो चेहरा होता अप्पा राव पोडिले यांचा. रोहितच्या आत्महत्येनंतर एक मोठी चळवळ सुरू झाली आणि भाजप वगळता अन्य सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी रोहितच्या हत्येच्या निषेधाच्या जाहीर सभा घेतल्या. रोहितला न्याय मिळवून देण्यासाठी एक संयुक्त कृती समिती अस्तित्वात आली आणि या समितीच्या आवाहनाला देशभरातील अनेक विद्यापीठांनी जोरकस प्रतिसादही दिला. चळवळीचा वाढता जोर पाहून आणि समितीनेे अप्पाराव यांच्या हकालपट्टीची आणि अटकेची मागणी केल्यामुळे अप्पा राव यांनी एक पाऊल मागे घेतले, ते रजेवर गेले आणि हैदराबाद विद्यापीठातील वातावरण सामान्य होऊ लागले. पण 22 मार्च 2016 रोजी अप्पा राव पुन्हा कामावर हजर झाले आणि त्यांनी अत्याचारांची एक नवी फेरीच सुरू केली.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe