97632 06212 pwatsaru@yahoo.com

सामाजिक वर्चस्वाची सखोल चिकित्सा


दलित चळवळ आणि राजकारणाने महाराष्ट्रातील सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जीवनाला प्रभावित केलं, नवीन दृष्टी आणि वेगळी जाणीव दिली. पण ‘खैरलांजी ते खर्डा’ या जातीय अत्याचाराच्या मालिकांचा ठाव घेताना तो विचार प्रतिक्रियेपुरता मर्यादित राहिल्याचे वास्तव नजरेआड करता येत नाही. हैद्राबाद विद्यापीठातील रोहित वेमुलाच्या आत्महत्येनंतर आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या शतकोत्तर रजतमहोत्सवाच्या निमित्ताने आंबेडकरी विचारांवर दावे सांगणार्यांची अहमहमिका दिसून आली. सामाजिक वर्चस्वाशी वैचारिक मुकाबला करणारा मुक्तिदायी फुले आंबेडकरी विचार आणि त्याच्याशी नाळ जोडणारं नातं निर्माण होण्यासाठी वैचारिक संवादाचं दालन सर्वांसाठी खुलं होण्याची गरज भासते आहे. ती गरज पुरी करण्याचं काम गोपाळ गुरू लिखित ‘वर्चस्व आणि सामाजिक चिकित्सा’ या हरिती प्रकाशनाच्या ग्रंथाकडून होण्याची अपेक्षा आहे.