97632 06212 pwatsaru@yahoo.com

आठवणींच्या झरोक्यातून ः एम. एस. कलबुर्गी


भालचंद्र जयशेट्टी डॉ. एम. एम. कलबुर्गी या युगातील कन्नड वाङ्मयाचे एक असामान्य संशोधक तसेच धीरगंभीर व्यक्ती होते. ते मला तीन वर्षांनी सिनियर होते. मी कलबुर्गी शहरात बी.ए.मध्ये शिकत होतो तेव्हा त्यांनी एम.ए.ची परीक्षा प्रथम वर्षी प्रथम श्रेणीमध्ये पास केली होती. विशेष गोष्ट ही होती की त्यांच्या एम.ए.च्या पाठ्यक्रमामध्ये केशीराज नावाच्या प्राचीन व्याकरणकाराचा ‘शब्दमणिदर्पण’ नावाचा प्रमुख ग्रंथ लागला होता. कलबुर्गीना त्या पेपरमध्ये 98% गुण मिळवून एक रेकॉर्ड निर्माण केले होते. अतिशय कठीण अशा ‘शब्दमणिदर्पण’मध्ये इतके गुण मिळवणे म्हणजे खेळ नव्हता.