97632 06212 pwatsaru@yahoo.com

जि.प.च्या शाळेतून


शहरापासून कधी अगदी हाकेच्या अंतरावर तर कधी जेमतेम दहा-बारा कि.मी.वर, कुठे पन्नास-पाऊणशे तर कुठे शे-पाचशे लोकवस्ती असलेल्या ठिकाणी, कुठे अगदी रस्त्यालगत तर कुठे डोंगराच्या पायथ्याशी, कुठे धुळीचे लोट सोडणारा रस्ता तर कुठे डांबरी सडक असे गेली अनेक दशके विखुरलेले जिल्हा परिषद शाळांचे नेटवर्क. शहराच्या मुख्य रस्त्यालगत असणार्या गावाच्या पोटात सुंदर निसर्ग आणि आणखी एक एक गाव आणि शाळा वसल्या असतील असे कधीच वाटले नव्हते. शहरातले आधुनिक जीवन, भौतिक सुविधा आणि उच्च अभिरुचीची शाल पांघरून जपल्या जाणार्या संस्कृतीपासून थोड्या लांब असणार्या या शाळा मला कायमच आपल्याकडे खेचत असल्याचे सतत जाणवत होते. त्यामागची अनेक कारणेही आहेत. माझ्या वडिलांचे थोडे फार झालेले शिक्षण अशा जिल्हा परिषद शाळेत झाले जेथे शाळेला जागा नाही म्हणून गावाने मंदिराचा वरचा भाग कापून वर शाळा काढली. त्यांच्या तोंडून ऐकलेले त्यांच्या शाळेतील अनुभव.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe