97632 06212 pwatsaru@yahoo.com

आम्हाला मारणे थांबवा


आज सर्वत्र ‘मेक इन इंडिया’, ‘स्मार्ट सिटीज’, ‘स्वच्छ भारत अभियान’ या घोषणांचा व स्वतःवर प्रसारमाध्यमांचा कसा सतत फोकस राहील याचा प्रयत्न पंतप्रधानांपासून, मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वजण सतत करत आहेत. परदेशी नागरिकांना ‘स्वच्छ भारत, स्वस्थ भारता’चे आश्वासन दिल्याने या घोषणेची तातडीने अंमलबजावणी करण्याची गरज पंतप्रधानांना वाटली पण ज्यांच्या जिवावर देशाची स्वच्छ प्रतिमा उभी करू पाहत आहेत त्या सफाई कामगारांचे आयुष्य किती भयानक आहे याची जाणीव राज्यकर्त्यांना नसल्यानेच त्यांना जागे करण्यासाठी व आम्हालाही माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे यासाठी 10 डिसेंबर 2015 पासून नवी दिल्लीतील नेहरू विश्व युवा केंद्र येथून एक यात्रा सुरू झाली असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीचे औचित्य साधून 13 एप्रिल 2016 रोजी या यात्रेची सांगता दिल्लीत होणार आहे. ही यात्रा जयभीम यात्रा म्हणून सर्व देशभर 125 दिवस फिरणार असून या दिवसात 500 जिल्हे व 30 राज्यांत ही यात्रा जाणार आहे.