97632 06212 pwatsaru@yahoo.com

भारताची अर्थस्थिती : धारणा आणि धोरणदिशा


अच्युत गोडबोले यांचा 1 ते 15 मार्चच्या वाटसरू’तील ‘भारताची अर्थस्थिती : धारणा आणि धोरणदिशा’ हे शीर्षक असलेला लेख मी वाचला. आजकाल जात, धर्म, ब्राह्मणशाही, मनुवाद, फॅसिझम इ. सामाजिक व राजकीय प्रक्रियांवर सार्वजनिक पातळीवर चर्चा सुरू आहे. अशा वातावरणात आर्थिक प्रश्नांबाबत चर्चा करण्याचा कोणी प्रयत्न केला तर माझासारखा माणूस सुखावतो. त्यामुळे अंक हातात पडल्याबरोबर मी सदर लेख अधाशासारखा वाचला. तसेच अशा प्रकारच्या लिखाणावर चर्चा व्हावी अशी माझी भूमिका असल्यामुळे या लेखाच्या संदर्भात जरा विस्ताराने चर्चा करण्याचा प्रयास मी करणार आहे.