97632 06212 pwatsaru@yahoo.com

भारताची अर्थस्थिती : धारणा आणि धोरणदिशा


एखाद्या वर्षी कर आणि इतर मार्गांनी आपल्याला किती उत्पन्न मिळेल आणि आपण कुठल्या वेगवेगळ्या गोष्टींवर किती खर्च करणार आहोत याविषयीचा अंदाज सरकार बजेटमध्ये सादर करतं. आपल्या सरकारनं खरं तर सर्वसामान्यांकरता आरोग्य, शिक्षण, पाणी, वीज, टॉयलेट्स, स्वस्त घरं अशा अनेक बाबींवर भरपूर खर्च करायला पाहिजे, पण सरकार तसा तो करत तर नाहीच, पण याच्या उलट अशा गोष्टींवरचा खर्च दिवसेंदिवस कमी कमी होत चालला आहे. महासत्तेचं स्वप्न बघणार्या भारतानं सर्वप्रथम या सर्व गोष्टींवर भर देऊन भरपूर पैसा पुढची अनेक वर्षं खर्च केला तरच भारत एक सुसंस्कृत, सुशिक्षित, सुदृढ, स्वच्छ, आनंदी आणि सर्वांना समान संधी देणारा देश म्हणून ओळखला जाईल. पण तसं करायचं म्हटलं तर 'सरकारकडे पैसा कुठे आहे?' असा प्रश्न प्रस्थापित निओलिबरल विचारवंत आणि अर्थतज्ज्ञ यांच्याकडून विचारला जातो. आणि त्यामुळे सरकारनं उलट खर्च कमी करावा; नाहीतर डेफिसिट वाढून महागाई वाढेल असा त्यांचा युक्तिवाद असतो. पण त्यांचा हा युक्तिवाद संपूर्णपणे चूक आहे. ते समजण्यासाठी आपण सध्याची स्थिती किती भयानक आहे ते प्रथम बघितलं पाहिजे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe