97632 06212 pwatsaru@yahoo.com

प्रक्षोभक तरीही संस्कारक्षम आकलन : 'भाळ-आभाळ'


'भाळ-प्रक्षोभक तरीही संस्कारक्षम आकलन : 'भाळ-आभाळ'आभाळ' ही तसनीम पटेल यांची नुकतीच प्रसिद्ध झालेली 'आत्मकथा' आहे. अलीकडच्या काळात मराठवाड्यातील ज्या काही मोजक्या विदुषींनी स्वकर्तृत्वाने महाराष्ट्राच्या पातळीवर स्वत:चे स्थान अधोरेखित केले त्यापैकी तसनीम पटेल हे एक महत्त्वाचे नाव आहे. त्या वक्त्या म्हणून प्रसिद्ध आहेत; निवडणुकीच्या राजकारणात सक्रिय राहूनही सत्तास्पर्धेपासून अलिप्त राहिलेल्या विचारवंत आहेत - एक उत्तम शिक्षक म्हणून त्या विद्यार्थीप्रिय प्राध्यापिका आहेत - मराठवाड्यातील सर्व जनता त्यांना एक संघर्षरत कार्यकर्ता म्हणून ओळखते. काही काळ त्या महाराष्ट्र राज्याच्या 'समाजकल्याण महामंडळा'च्या अध्यक्षा होत्या. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात (नांदेड) येथे त्या विद्यार्थी 'कल्याण विभागाच्या' संचालक होत्या. सध्या त्या 'नांदेडच्या पीपल्स कॉलेज'मधील हिंदी विभागात प्राध्यापक आहेत. सेवानिवृत्तीपूर्वीची काही वर्ष त्यांना जो निवांतपणा मिळाला त्याचा 'आत्मकथन' लिहिण्यासाठी त्यांनी उपयोग करून घेतला. त्यांची ही चारशे पृष्ठांची 'आत्मकथा' अगदी एका बैठकीत वाचून संपवावी इतक्या वेधक शैलीत त्यांनी लिहिली आहे. मराठी साहित्यातील 'चरित्र आत्मचरित्र' या वाङ्मयप्रकारात एक मौलिक भर घालणारा ग्रंथ म्हणून या आत्मकथेचे स्वागत होईल याची मला पूर्ण खात्री आहे.