97632 06212 pwatsaru@yahoo.com

आंबेडकरांचे अपहरण


'संघानं काय डाव टाकलाय! थेट आंबेडकरांनाच उचललं!' अशी फुशारकी कित्येक संघवाले मारू लागले आहेत. याच शब्दांत कित्येक डावे काळजी व्यक्त करू लागले आहेत. खुद्द कित्येक संघ पदाधिकारी शकुनीमामाच्या सिरियली शैलीत स्वत:शीच 'काय डाव टाकलाय' असा शाबासकीचा संवाद करू लागले आहेत. पण हा डाव चांगलाच उलटणार आहे, काळजीचे कारण नसावे. फुशारकी मारणार्यांची फसगत तर शाबासकी घेणार्यांची शामत ओढवणार आहे. कारण उघड आहे. आंबेडकरांना 'आपलेसे' करण्याची ताकद कोणातही नाही. आंबेडकर ना कधी कोणाच्या जवळ गेले, ना कधी कोणाला त्यांनी जवळ येऊ दिले. तेव्हा ते कोणाचे अंकित होतील अशी शक्यता नाही. सत्तेच्या राजकारणात तडजोडी होत असतात. डॉ. आंबेडकरांनी तशा सत्तेसाठी केलेल्या नाहीत. खरे तर 'ऑन माय टर्म्स' असे आत्मचरित्राचे शीर्षक शरद पवार यांना शोभत नाही. ते आंबेडकरांच्या आत्मचरित्राला चोख शोभले असते. लांगुलचालन, चापलुसी, डावपेच, लाचारी किंवा गुप्त समझोते आंबेडकरांच्या राजकारणात अजिबात आढळत नाहीत. त्यामुळे आंबेडकर कोणा अमक्याच्या कह्यात गेले अन् कोणा तमक्याने आंबेडकरांवर कब्जा केला, असे कधी होणार नाही.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe