97632 06212 pwatsaru@yahoo.com

डेंगचा 'समाजवादी' चीन : नाव मोठे लक्षण खोटे


सोव्हिएत युनियन 1989 मध्ये कोसळत असताना, चीनमध्ये डेंग झिआओ पिंग यांनी सुरू केलेला आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम मुळे धरू लागला होता. डाव्या, उजव्या विचारसरणीच्या सर्वच सजग नागरिकांमध्ये चीनच्या आर्थिक प्रगतीचे बाहेर प्रसृत होणारे आकडे आदराने चर्चिले जात होते. दरवर्षी सातत्याने अर्थव्यवस्थेची वाढ करीत चीनने अमेरिकेला जवळपास गाठलेले आहे; 2020 सालापर्यंत ती अमेरिकेला मागे टाकेल असे अंदाज वर्तवले जात आहेत. असे असले तरी गोष्टी बदलत आहेत. आज 2015 मध्ये चीनच्या अर्थव्यवस्थेच्या भविष्याबद्दल साशंकता व्यक्त होऊ लागल्या आहेत. समाजवादी मार्केट, चिनी गुणवैशिष्ट्ये यासारखे चमकदार शब्दप्रयोग करून डेंगच्या समाजवादी चीनच्या प्रयोगाला एक भारदस्त वैचारिक फ्रेम असल्याचा भास गेली काही दशके तयार करण्यात आला होता. पण या वैचारिक फ्रेमच्या मागे चीनच्या कम्युनिस्ट पक्षांच्या पदाधिकार्यांचे वर्गीय हितसंबंध दडलेले आहेत हे आता सूर्यप्रकाशाएवढे स्पष्ट झाले आहे. या पदाधिकार्यांच्या डॉलर्समधील मिळकतीवर चिनी कष्टकर्यांचा घाम व रक्ताचे डाग आहेत. समाजवादाच्या नावाखाली चीनमध्ये जे काही चालू आहे ते सर्वच डाव्या विचारांच्या लोकांसाठी विचार करण्याला भाग पाडणारे आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe