97632 06212 pwatsaru@yahoo.com

आंबेडकरांच्या नावानं!


आताता लंडनमध्ये आंबेडकरांच्या नावानं एक आंतरराष्ट्रीय स्मारक उभं राहणार आहे. आंबेडकर ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ या संस्थेमध्ये शिक्षण घेत असताना इ.स. 1920 च्या दशकातील सुरुवातीच्या काळात ह्या घरात राहत होते. घराच्या मालकाने ऑगस्टच्या तिसर्या आठवड्यात एक खरमरीत निर्वाणीचा इशारा दिल्यानंतर नोकरशाहीच्या पातळीवरील सरकारचे अपयश उघडे पडले. महाराष्ट्र राज्य सरकारच्या वाचाळ मंत्र्यांसाठीसुद्धा ही अत्यंत लाजीरवाणी बाब ठरली. कारण ह्याच वाचाळवीरांनी काही महिने अगोदरच असे जाहीर केले होते की, सरकारने ते घर खरेदी करून स्मारकनिर्मितीची प्रक्रिया सुरू केली आहे. घरमालकाने अखेरचा इशारा दिल्यानंतर प्रकरण पुढे सरकले. जवळपास 3.1 मिलियन पौंड एवढी रक्कम देऊन ते घर अखेरीस खरेदी करण्यात आले. त्याचे क्षेत्रफळ 2050 चौरस फूट आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe