97632 06212 pwatsaru@yahoo.com

व्हर्मंटच्या मातीतून कविता खणून काढणारा कवी : रॉबर्ट फ्रॉस्ट


न्यूझीलंडमधील एका रस्त्यावर फोर्ड मोटार कंपनीच्या एका जाहिरातीद्वारे वरील ओळी झळकताहेत. अर्थातच या ओळी अमेरिकन कवी रॉबर्ट फ्रॉस्टच्या 'द रोड नॉट टेकन' या अजरामर मालिका आणि स्प्राय फॉक्सच्या 'रोड नॉट टेकन' या व्हिडिओ गेमने या कवितेतल्या ओळी वापरून आपल्या व्यवसायांना तेजी आणली. पत्रकार आणि लेखकांवर तर या ओळींनी गारूड केलं. गेल्या 35 वर्षातच जवळजवळ चारशे विविध पुस्तकांची, शीर्षकं, उपशीर्षकं किंवा प्रकरणात या कवितेतील शब्दांचा खुबीने वापर केला आहे. 'द रोड लेस ट्रॅव्हल्ड : न्यू सायकॉलॉजी ऑफ लव्ह, ट्रडिशनल व्हॅल्यूज अॅण्ड स्पिरिच्युअल ग्रोथ' या आंतरराष्ट्रीय बेस्ट सेलर पुस्तकाच्या 70 लाख प्रती अमेरिका व कॅनडा येथे विकल्या गेल्या आहेत. फ्रॉस्टनंतरच्या टी.एस. एलिएट, एझ्रा पाऊंड या कवींनी आधुनिक युगाचे कवी म्हणून अमाप प्रसिद्धी मिळविली होती. गुगलने 2012 मध्ये एक तुलनात्मक पाहणी केली होती. एलिएट यांच्या 'द वेस्ट लॅण्ड' या कवितेपेक्षा 'द रोड नॉट टेकन' या कवितेचा चौपटीनं अधिक संदर्भ लोक वापरतात असं आढळून आलं होतं. पाऊंड यांच्या 24 पटीनं अधिक फ्रॉस्टच्या कवितांचा संदर्भ वापरला जातो.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe