97632 06212 pwatsaru@yahoo.com

पटावर पाटीदार : पडाआडची पटकथा


केवळ देशातच नव्हे तर जगाच्या पाठीवर आपल्या सामर्थ्यासाठी नावाजला गेलेला, अन्य समाजांना ज्याचा हटकून हेवा वाटतो असा गुजरातमधील पाटीदार, पटेल समाज अतिसामान्य पार्श्वभूमी असलेल्या, खेड्यात राहणार्या एका तरुणाच्या मागे बघणार्याने विस्मयचकीत व्हावे इतक्या प्रचंड संख्येने उभा राहावा आणि त्या तरुणाच्या सूरात सूर मिसळून आपला मागासवर्गीय दर्जा मान्य करून ओबीसींमध्ये (इतर मागास वर्गात) आपला समावेश व्हावा अशी मागणी करतो - भारताच्या असंगत रंगभूमीवरील हा एक नवा नाट्यप्रयोग 25 ऑगस्ट रोजी अहमदाबाद शहरामध्ये साकारला. होय, हा तोच पाटीदार समाज आहे, जो नरेंद्र मोदींच्या 'चैतन्यमयी गुजरात'च्या बंडलबाजीचा गेली 13 वर्षे कणा होता, आता अचानकच त्याने मोदींची साथ सोडल्यामुळे मोदींची भाषा म्हणजे शुद्ध बंडलबाजी होती यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मोदींनी गुजरातेतील बड्या, धनदांडग्या उद्योगांना करून दिलेला लाभ आणि सामान्यांच्या झोळीत पडलेली वंचना याशिवाय काहीही नवे, वेगळे केले नव्हते हे आता सिद्ध झाले आहे आणि तरीही मोदी राज्यातील एका पाठोपाठ एक निवडणूक जिंकत राहिले असले तरी त्यातून गुजरातचे सामाजिक वास्तव बदलले असल्याचा निष्कर्ष निघू शकत नाही, कारण स्मार्ट बाजारू खेळ्या करून निवडणुका कशा जिंकाव्यात, यात मोदी माहीर आहेत. असो, तरीही मोदींच्या बालेकिल्ल्यात घडलेल्या अलीकडच्या या घडामोडींनी सारा भारत चकित झाला आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe