97632 06212 pwatsaru@yahoo.com

प्रफुल बिडवई : सदैव लोकाभिमुख भूमिका आग्रहाने मांडणारा सच्चा कॉम्रेड


प्रफुल आता आपल्यामध्ये नाही, हे वास्तव स्वीकारणे कठीण आहे. 24 जून 2015 रोजी अॅामस्टरडॅम, नेदरलँड येथे वयाच्या पासष्टाव्या वर्षी त्याने या जगाचा निरोप घेतला. आजघडीला जागतिक राजवटीबरोबरच विविध राष्ट्र-राज्यांनी अंगीकारलेल्या कॉर्पोरेटनियंत्रित विकासाच्या प्रारूपाबाबत प्रफुलने नेहमीच टीकात्मक व आलोचनात्मक भूमिका मांडली. या कॉर्पोरेटकेंद्रित विकासाच्या प्रारूपामुळे समाजातील गरीब जनतेपुढे विस्थापन व कोणत्याही प्रकारच्या भौतिक सामाजिक सुविधांचा अभाव असलेल्या प्रदेशामध्ये पुनर्वसन हे दोनच पर्याय शिल्लक राहतात. प्रफुलच्या मते बहुराष्ट्रीय कंपन्या व आंतरराष्ट्रीय संघटना आज वाढती बेरोजगारी, पर्यावरणाचा वाढता र्हास व कामगार प्रक्रिया व कामगार यांचे मूल्य कमी करण्याच्या प्रक्रियेला अनुकूल अशा धोरणनिर्मितीस हातभार लावत आहेत.