97632 06212 pwatsaru@yahoo.com

नेमाडेंच्या लिखाणाचा धसका


‘परिवर्तनाचा वाटसरू’च्या अंकात नेमाडे यांच्या लिखाणावर रावसाहेब कसबे यांचा लेख छापून आला आहे. त्या लेखाविषयी माझे मत... रावसाहेब कसबे यांचा लेख वाचल्यावर एक गोष्ट नक्की जाणवते, ती म्हणजे नेमाड्यांच्या लिखाणाचा प्रचंड धसका त्यांनी घेतलेला आहे. एकीकडे ते नेमाड्यांचे लिखाण किती तकलादू आहे असेही म्हणतात तर दुसरीकडे ते त्यांना प्रेषिताच्या पातळीवर नेऊन ठेवतात आणि स्वतःच्या दुभंगलेल्या मानसिकतेचा दाखला देतात. ‘नेमाडे इतिहासाची चाके उलटी फिरवणार आहेत काम?’ वगैरेसारखे बाळबोध प्रश्न विचारून कसबे आपल्या विचारांच्या खोली किती उथळ आहेत हे स्पष्ट करतात, कारण नेमाड्यांच्या लिखाणाचे सामर्थ्य चार दशके महाराष्ट्राने अनुभवलेले आहे. त्याकरता कसबे यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही. निव्वळ लोकप्रियतेच्या जोरावर नव्हे तर त्यांच्या लिखाणापासून स्फुरलेल्या नंतरच्या अनेक पिढ्यांचे लेखन व त्यांना मिळालेल्या समाजमनाच्या पावत्या हे त्यांच्या लिखाणाच्या सामर्थ्याचेच द्योतक आहेत.