97632 06212 pwatsaru@yahoo.com

नागरिक : कॉर्पोरेट शोषणाचा कलात्मक आविष्कार


भारतीय चित्रपटाच्या शतकोत्तर पर्यावरणात सर्वगामी शोषणाला कलात्मकतेने भिडून सिनेमासारख्या अत्यंत प्रभावी दृक्श्राव्य माध्यमांद्वारा ‘तहलका’ घडवणारे जिगरबाज दिग्दर्शक-निर्माता-कलावंत यांची संख्या बोटांवर मोजावी इतकी रोडावत चाललेली आहे. तीनेक दशकांपूर्वीपर्यंत सिनेमाकलेच्या प्रदेशात समस्याप्रधान-कलात्मक समांतर चित्रपटांची रसद पुरविणार्याद निर्माता-दिग्दर्शकांची एक फळी राबती असायची. त्यांची वेगळी इज्जत असायची. अशा निर्मितीमध्ये ‘रिस्क फॅक्टर’ असायचा पण ती रिस्क पेलवणारे मजबूत खांदेसुद्धा साथीला असायचे. ‘सिनेमाकला ही जनसामान्यांमध्ये अमानवी शोषणमूल्यांविरुद्ध उभे राहण्याची नैतिकता पेरू शकते.’ हे त्यांच्या अंतर्मनानेस्वीकारलेले शहाणपण, हेच त्यांचे बळ होते. पुढेपुढे सिनेमाकलेत बाजाराचे ठेकेदार घुसले आणि (काही सन्माननीय अपवाद वगळता) एका उत्तम कलेचा कल्ला होऊन केवळ गल्ला जमविणे सुरू झाले. याही पार्श्वीभूमीवर सिनेमाकलेच्या नैतिक मूल्यांप्रतिची जाण व तिच्या सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून या माध्यमांतून शोषणांविरुद्ध कलात्मक एल्गार मांडणारे दिग्दर्शक-कलावंत आपली शिडे भक्कमपणे रोवून आहेत याची साक्ष, नुकताच प्रदर्शित झालेला ‘नागरिक’ हा चित्रपट देऊन जातो.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe