97632 06212 pwatsaru@yahoo.com

मराठा आत्मोन्नतीचा संघर्ष व जागृतिकार पाळेकर


मिरासदार वा जमीनमालक शेतकरी समुदायाच्या घडणीच्या अशा सामाजिक प्रक्रियेतून तत्कालीन राज्यसंस्थेचे रूप घडले. या प्रक्रियेत शेतीच्या वहितीकरणाद्वारा खेडी बसवणार्या शेतकरी समुदायातील सर्वात प्रभावी कुटुंबाचे प्रमुख गावाचे पाटील बनले, तर त्या समुदायाचे गणसमाजाच्या वारशातून आलेले नायक/प्रमुख प्रादेशिक व केंद्रीय राज्यसत्तेचे अधिपती झाले (लेले, १९८२:४६). अगणीकरणाच्या प्रक्रियेत गणसमाजांच्या सत्तांचे स्वायत्त परीघ नष्ट होऊन राजेशाहींचा अंमल विस्तारला. त्यामध्ये उगवत्या शेतकरी समूहांच्या समुदाय सत्तेचा आकृतिबंध एकवटला गेला. त्या काळात महाराष्ट्रात उदय पावणार्या शेतकरी समुदायांची सत्तापद्धती एकसंघीयतेने प्रभावित झालेली होती. पार्थ चटर्जी यांनी शेतकरी विद्रोहाचा अभ्यास करताना शेतकरी समुदायाच्या एकसंघीय सत्तापद्धतीची दखल घेतली आहे. ‘पूर्ण समूहाच्या सामुदायिक अधिकारशक्तीमधून व्यक्ती किंवा गट यांचे अधिकार, मानपान, कर्तृत्व यांचे वितरण होते, तेव्हा समुदाय सत्तापद्धती अस्तित्वात येते’ असे ते म्हणतात. (चटर्जी, १९८३:३१७) समुदायामध्ये ज्येष्ठांचे मंडळ वा समूह नायकामार्फत सत्ता कार्यान्वित होत असताना दिसत असली, तरी समुदायाची अधिसत्ता कोणत्याही एका व्यक्ती वा अधिकारपदाच्या ठायी केंद्रित झालेली नसते, तर ती समुदायाच्या एकसंघीयतेठायी निहित असते. (बगाडे, २०१०:८९). चटर्जी यांचे हे विवेचन वसाहतकालीन जातिसमाजातील शेतकरी समूहांबाबत असले तरी पूर्वापार चालत आलेल्या समुदायसत्तेच्या स्वरूपाची ते नोंद घेते.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe