विजय तेंडुलकरांनी दोन कादंबर्याे लिहिल्या आहेत. त्यांची पहिली कादंबरी ‘कादंबरी : एक’ या नावाने १९९६ साली प्रसिद्ध झाली. तर त्यांची दुसरी कादंबरी ‘कादंबरी : दोन’ या नावाने इ.स. २००४ साली प्रसिद्ध झाली. नाट्यलेखनासाठी सर्व मानसन्मान मिळाल्यानंतर तेंडुलकर कादंबरी या वाङ्मयप्रकाराकडे वळले. आपल्या अभिव्यक्तीसाठी कोणता वाङ्मयप्रकार अधिक पोषक असू शकेल याची चाचपणी प्रत्येक लेखक अगदी सुरुवातीच्या काळात करीत असतो. ज्या वाङ्मयप्रकारात अभिव्यक्त होताना आपणाला पुरेसे समाधान मिळाले आहे असे त्याला वाटते तोच त्याचा वाङ्मयप्रकार असे तो मनाशी ठरवतो आणि वाचकांनाही त्याच व वाङ्मयप्रकारातले त्या लेखकाचे लेखन आवडू लागते, म्हणजे त्याचा कुठला तरी एक वाङ्मयप्रकार निश्चित होतो.
Subscribe Now !
Get instant access to the complete Watsaru archives
New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.